परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

शिवसेना-भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी शिवसेना-भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.

परभणी - शिवसेना-भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी शिवसेना-भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, स्वामीनाथ आयोगाची आंमलबजावणी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकरी संपादरम्याण शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, वीज बिल माफ करावे अशा मागण्या या मोर्चाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत. शहरातील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या निवास्थापासून हा मोर्चा निघाला. मोर्चादरम्यान बैलगाडीमध्ये शेतकरी आत्महत्या करतानाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. विविध मागण्यांचे फलक घेऊन शेतकरी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. शासन शेतकरीविरोधी असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. विसावा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वळसा घालून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकला.

याठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवल्याने प्रातिनिधीक स्वरुपात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात माजी खासदार सुरेश जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, संतोष देशमुख, श्रीकांत विटेकर, गजानन वैद्य, किरण तळेकर, सुमंत वाघ, मारोती बनसोडे, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
कर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​

Web Title: marathi news parbhani news farmer strike marathawada news