सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

नेताजी नलवडे 
गुरुवार, 11 जानेवारी 2018

वाशी (जि.उस्मानाबाद) - तुळजापुर येथून मंगळवार (ता. १६) रोजी पासून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरु होत आहे. यामध्ये परांडा विधानसभा मतदार संघातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोलते पाटिल यांनी गुरुवार (ता. ११) रोजी वाशी येथे भेट दिली. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रशांत कवडे यांच्या निवासस्थानीही भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोलते पाटिल हे प्रथमच तालुक्यात आल्याने त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी भास्कर शिंदे, प्रशांत कवडे, सतिश कवडे, बालाजी मोटे, विकास पवार, संतोष कवडे, सुर्यकांत सांडसे, अभिजीत जगताप, संतोष पवार, श्रीकांत हाके, सुरज मोटे, निवांत कवडे, लालासाहेब चेडे, हरिभाऊ गायकवाड, किरण पाटिल, रणजीत गायकवाड, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, भाऊसाहेब गायकवाड, धनंजय कागदे, नवनाथ भांडवले, विनोद माने, गफार लोहार, रामलिंग शिंगणापुरे, अमोल माने आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: marathi news political news government against NCP