वाहनांच्या धडकेत दोन तरुण ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोनजण ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हि घटना मंगळवारी (ता. 6) रात्री दीडच्या सुमारास पडेगाव-मिटमिटा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिवाजी हिवाळे (24, रा. शिवराई, पडेगाव), सनी उर्फ शुभम रमेश राऊत (22, रा. पडेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर आकाश रमेश सोनवणे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मिटमिटा येथील एका पेट्रोल पंपावर कामाला आहे. त्याला आणण्यासाठी शुभम व श्रीकांत दुचाकीने मंगळवारी रात्री मीटमिटा येथे गेले. तेथून एकाच दुचाकीवरून तिघे परतताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

औरंगाबाद - अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोनजण ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हि घटना मंगळवारी (ता. 6) रात्री दीडच्या सुमारास पडेगाव-मिटमिटा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिवाजी हिवाळे (24, रा. शिवराई, पडेगाव), सनी उर्फ शुभम रमेश राऊत (22, रा. पडेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर आकाश रमेश सोनवणे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मिटमिटा येथील एका पेट्रोल पंपावर कामाला आहे. त्याला आणण्यासाठी शुभम व श्रीकांत दुचाकीने मंगळवारी रात्री मीटमिटा येथे गेले. तेथून एकाच दुचाकीवरून तिघे परतताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात तिघे रस्त्यावर फेकले गेले व डोक्यावर धाडकन आपटले. यात शुभम व श्रीकांत ठार झाले. श्रीकांत एका खाजगी टेलिकॉम कंपनीत कामाला होता तर शुभम छायाचित्रकार होता. 

Web Title: marathi news vehicle accident two boys dead