व्हिडियोकॉनचे काम बंद!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - राज्यातील इलेक्ट्रॉनिक जगतातील महत्वाची कंपनी असलेल्या व्हिडियोकॉनने आपल्या मनुष्यबळाला तब्बल १२ दिवसांची जम्बो सुट्टी दिली आहे. कच्चा माल नसल्याचे कारण देत कंपनीने सध्या आपले काम बंद ठेवले आहे. 

इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या औरन्गबादेतील व्हिडियोकॉन उद्योगाने आपले संपूर्ण मनुष्यबळ अचानक सुट्टीवर पाठवले आहे.कंपनीच्यादरवाजांना टाळे लागले असून प्रोडक्शन लाईनसुद्धा कंपनीने बंद केली आहे. शनिवार (ता. सहा) पर्यंत कंपनीतील काम सुरु होते. पण शनिवारी अचानक कंपनीत काम करत असताना प्लांट १८ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तोपर्यंत सर्वांना सुट्टीवर जाण्याचे आदेश देण्यात आले. या नंतर पुढे काय, हे सांगण्यासाठी मात्र कंपनीतून अद्याप कोणालाही संपर्क करण्यात आलेला नाही. १८ तारखेपर्यंत सुट्टी असली तरी ही सुट्टी लांबण्याची शक्यता असल्याची माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सध्या कंपनीचे ७०० ते ८०० कामगार, अधिकारी सुट्टीवर पाठवण्यात आले आहेत. 

Web Title: marathi news Videocon company work off