बाराखडी न आल्याने पित्याकडून चिमुकलीचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

औरंगाबाद- बाराखडी येत नाही म्हणून एका पित्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना बाळापूर गावात रविवारी (ता. 10) रात्री घडली.

भारती कुटे असे मृत मुलीचे नाव आहे. पहिलीत शिकणाऱ्या मुलीला बाराखडी येत नाही, म्हणून संतापलेल्या पित्याने मुलीच्या तोंडात कांदा कोंबून तिचा खून केला. त्यानंतर परस्परच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मुलीची आईची अनुसया कुटे यांच्या तक्रारीनंतर चिखलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयित पिता राजेश कुटेला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: marathi Ryms did not kill me girl child