मालखेडा पाटीवर मराठा क्रांती मोर्चाचा दीड तास रास्ता रोको

दीपक सोळंके
रविवार, 29 जुलै 2018

मराठा आरक्षणाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करीत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन- सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मालखेडा पाटीवर आज रविवारी (ता. 29) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी मराठा आरक्षणाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करीत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दरम्यान आंदोलनामुळे भोकरदन व सिल्लोडकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. याशिवाय केदारखेडा येथेही सरकारच्या विराधात मुंडन आंदोलन करण्यात आले. मागील सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भोकरदन शहरासह तालुक्यातील अनेक गावात विवीध आंदोलने करून मराठा आरक्षण मंजुरीसाठी प्रशासनाला निवेदने देण्यात आले आहेत.

 

Web Title: MarathKrantiMorcha at bhokardan jalna