स्वच्छ शहरांच्या यादीत मराठवाड्यातील 8 शहरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

नांदेड - "स्वच्छ भारत' मोहिमेतील 2016-17 च्या सर्वेक्षणात 434 स्वच्छ शहरांची यादी गुरुवारी (ता. 4) घोषित झाली. त्यात मध्य प्रदेशातील इंदूर अव्वल, तर भोपाळने दुसरा क्रमांक पटकावला. राज्यातील 44 शहरांचा या यादीत समावेश असून त्यात मराठवाड्यातील आठ शहरे आहेत. मराठवाड्याच्या तुलनेत नांदेड आघाडीवर आहे.

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीत ही यादी जाहीर केली. पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश असून ती आठवा क्रमांकावर आहे. पुणे शहर तेराव्या, तर मुंबई 29 व्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील गोंडानंतर भुसावळ (जि. जळगाव) सर्वात अस्वच्छ शहर ठरले आहे. नांदेडचा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील अन्य सातही शहरांचा क्रमांक दोनशेच्या पुढे आहे.

मराठवाड्यातील शहरे
(कंसात क्रमांक ) नांदेड 192 , उस्मानाबाद 219, परभणी 229, उदगीर 240, औरंगाबाद 299, बीड 302, लातूर 318, जालना 368.

नांदेडला मराठवाड्यात पहिला आणि देशात 192 क्रमांक मिळाल्याबद्दल महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी कुरेशी, विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, संतोष कंदेवार, सहायक आयुक्त संजय जाधव आदींनी समाधान व्यक्त केले आहे. नांदेडकरांच्या सहकार्याने भविष्यात आणखी चांगल्यापद्धतीने शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Web Title: marathwada 8 cities in clean city