
Jalna News : जालना जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाभरात आंदोलन
जालना - भोकरदन येथे तालुका काँग्रेस कमिटी द्वारे शहरातील एसबीआय बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी "या केंद्र सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय " व "अदानीच्या गैरकारभाराची चौकशी झालीच पाहिजे " अशा घोषणा देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आंदोलनावेळी म्हणाले
अदानीच्या गैरकारभाराचा भंडाफोड झाला असुन तब्बल ७ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.हा पैसा सुरक्षित राहावा व गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष त्रिंबक पाबळे, प्रदेश पदाधिकारी भाऊसाहेब सोळुंके, अनिल देशपांडे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, इरफान सिद्दीकी,शेख रिझवान, चंद्रकांत पगारे,महेश दसपुते, शालीकराम गावंडे, दादाराव भोंबे, शेख सलीम,विष्णु भालेराव,सुखदेव रावळकर, कैलास सुरडकर,अजीज पार्टी, अनिल पगारे, रमेश जाधव,संतोष अन्नदाते, सोपान सपकाळ यांच्या सह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.