esakal | Marathwada: तोतये पोलिस बनून व्यापाऱ्याला लुबाडले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गेवराई : तोतये पोलिस बनून व्यापाऱ्याला लुबाडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेवराई : आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत. आम्हाला तुमची चौकशी करायची आहे असे सांगून दोन जणांनी गेवराई येथील एका आडत व्यापाऱ्याला लुबाडल्याची घटना मंगळवारी (ता.१२) घडली. यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार मोंढा भागातील जय हनुमान मशिनरीसमोर घडला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई येथील महेश कॉलनीत वास्तव्यास असलेले गंगाबिषण बिहारीलाल भुतडा ( वय ५९) वर्ष यांचे मोंढा येथे श्रीनिवास भुसार धान्य खरेदीचे दुकान आहे. दरम्यान मंगळवारी भुतडा हे घराकडे जात असताना वाटेत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत. आम्ही रात्री पाच ते सहा लाखांचा गांजा पकडला आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

त्यासंदर्भात तुमची चौकशी करायची असून तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलावले आहे असे म्हणत व्यापारी भुतडा यांच्या गळ्यातील दोन ग्रॅमची चैन, पाच ग्रॅमची अंगठी व रोकड असा जवळपास एक लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. हा सर्व प्रकार मोंढा भागातील जय हनुमान मशिनरी समोर घडला असून तेथील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top