esakal | Marathwada: हिंगोलीसाठी २९७ कोटींच्या निधीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Crop insurance

हिंगोलीसाठी २९७ कोटींच्या निधीची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली, ता. १४ (बातमीदार) : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. जिरायत, बागायत व फळपिके असे दोन लाख ९५ हजार ९४६.८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी प्रचलित नियमानुसार अपेक्षित निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली.

जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी २०२ कोटी ५७ लाख ४५ हजार ६५५ रुपये एवढा अपेक्षित होता परंतु १३ ऑक्टोबर रोजी केलेल्या नवीन घोषणेनुसार नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली असून यामध्ये एकूण २९७ कोटी २५ लाख ८६ हजार ४५० रुपयांचा निधी अपेक्षित आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे संयुक्त पथकाकडून करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्याने शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

१३ ऑक्टोबरपूर्वी सादर केलेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यात जिरायत बागायात व फळ पिके मिळून ६३ हजार ६२२.४० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायतसाठी ४३ कोटी २५ लाख ३७ हजार ८०० रुपये एवढा निधी लागणार आहे. बागायत बाधित क्षेत्र नाही. फळपिकांसाठी २५ लाख २०० रुपये असा एकूण ४३ कोटी २७ लाख ८८ हजार रुपये लागणार आहेत. कळमनुरी तालुक्यात ६० हजार ७८४.५८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले जिरायतसाठी ४० कोटी ३८ लाख ९ ६ हजार २०० रुपये लागणार आहेत. बागायतसाठी एक कोटी २७ लाख ८५ हजार ५८०, फळपिकांसाठी ७९ लाख ३८ हजार असे एकूण ४२ कोटी ४६ लाख १९ हजार ७८० रुपये एवढा निधी लागणार आहे.

loading image
go to top