मराठवाड्याच्या विकासाचा बॅनर अमित देशमुखांच्या हातात- चव्हाण

मराठवाड्याच्या विकासाचा बॅनर अमित देशमुखांच्या हातात- चव्हाण

लातूर- दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम केले. नावलौकिक मिळवला. त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा बॅनर तयार केला होता. आता आमदार अमित देशमुख यांची जबाबदारी वाढली आहे. हा विकासाचा बॅनर घेवून मराठवाड्य़ाला त्याच उंचीवर नेण्याचे काम करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरीसकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता.24) झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, सुवर्णाताई देशमुख, आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, धीरज देशमुख, आमदार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील मुरुमकर, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्य़क्ष डॉ. सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्राची साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे काम विलासरावांनी केले. मराठवाडयात त्यांनी साखर कारखानादारीची स्पर्धा सुरु केली. त्यांची प्रेरणा घेवून अनेक कारखाने सुरु झाले. शेतकऱयांच्या जीवनात अर्थक्रांती घडवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम केले. मराठवाड्याचा विकासाचा बॅनर त्यांनी तयार केला. आता हा बॅनर हातात घेवून मराठवाड्याला उंचीवर नेण्याचे काम अमित देशमुख यांना करायचे आहे.

विलासरावांनी मला ताकद दिली. मोठा भाऊ म्हणून अमित देशमुख यांना आपण ताकद देणार असल्याची कमिटमेंट या सभेत देत असल्याचे चव्हाण म्हणाले. सुशिलकुमार शिंदेही यांनी ही विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. एका घटनेनंतर माझे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद गेले तर आम्ही मैत्रीत कधीच दुरावा येवू दिला नाही. आमची मैत्री कायम राहिली. राज्यात त्यांनी मला व पुन्हा मी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा पदभार दिला. राजकारणात असे क्वचित घडते, असे शिंदे म्हणाले. किती दिवस जगलो या पेक्षा समाजासाठी आपण काम केले का हे महत्वाचे असते. विलासरावांनी स्वतःचा कधीच विचार केला नाही. शेवटपर्यंत ते समाजासाठी काम करीत राहिले, असे चाकूरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com