सात हजारांहून अधिक गावांची पैसेवारी पन्नासच्या आत

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विभागातील एकूण गावांपैकी एक हजार 252 गावांतच फक्त समाधानकारक स्थिती असल्याचे म्हटले आहे. 

केंद्र सरकारच्या नव्याने बदललेल्या निर्देशानुसार 31 ऑक्‍टोबरला राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तत्पूर्वी, हंगामी आणि सुधारित पैसेवारीच्या आकडेवारीत 15 डिसेंबरच्या तुलनेत अंतिम पैसेवारीत जवळपास सव्वाआठशे गावांची भर पडली आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागातील एकूण आठ हजार 533 गावांची अंतिम पैसेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यात सात हजार 281 गावांची पैसेवारी पन्नासच्या आत असून, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील सर्वच गावांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी 50 पन्नासपेक्षा अधिक आहे. परभणी जिल्ह्यातील 772 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी, तर उर्वरित 77 गावांची त्यापेक्षा अधिक आहे. नांदेड जिल्ह्यातील एक हजार 94 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आणि 468 गावांची पैसेवारी 50 च्या वर आली आहे. 

47 तालुक्‍यांसह 68 मंडळांत दुष्काळ 
केंद्र शासनाच्या नियमानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात 31 ऑक्‍टोबरला दुष्काळ जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्रातील 151 तालुक्‍यांसह 268 मंडळांत दुष्काळ असल्याचे घोषित केले असून, यात मराठवाड्यातील सर्वाधिक 47 तालुक्‍यांसह 68 मंडळांचा समावेश होता. त्यात आता 15 डिसेंबरच्या अंतिम पैसेवारीत 823 गावांची अधिक भर पडली आहे. मराठवाड्याचा विचार करता एकूण आठ हजार 533 गावांपैकी एक हजार 252 गावांतच समाधानकारक स्थिती असल्याचे चित्र समोर आले आहे.

Web Title: marathwada drought affected area