घनसावंगी : पावसांचा जोर कायम, खरिपांची पिके गेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crops

घनसावंगी : पावसांचा जोर कायम, खरिपांची पिके गेली

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात सलग तीन ते चार दिवसपासून जोरदार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असतांना मंगळवार (ता.सात) तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाल्याने सर्वत्र दाणादाण झाली असून पिकासह जमीनी खरडून गेल्याने आता ओल्या दुष्काळांची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांतून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

घनसावंगी तालुक्यात मागील तीन ते चार दिवसापासून मुसळधार व जोरदार पावसांचा जोर काही केल्या कमी होत नसल्याने खरिपांची सर्वच पिके पाण्याखाली गेली आहे. मंगळवार (ता.सात) पुन्हा एकदा दुपारी ढगफुटी झाली त्यामुळे आता सवत्र दाणादाण झाली आहे. खरिपांची मूग, सोयाबीन, कापूस यापिकाबरोबर मोसंबी, डाळींब, पपई या फळबागांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले आहे.

crops

crops

सोयाबीन व कापसांच्या शेतात पाणी साचून ती झाडे व बोंडे सडली आहे. नदी काठच्या शेतात तर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदा खरिपांचा हंगाम तर वाया गेला आहे त्यातच फळबागांवर ही संकट आल्याने यंदा शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. तसेच हा पाऊस उघडण्याची चिन्हे दिसत नाही त्याचबरोबर पाऊस उघडल्यास अजून महिनाभर तरी वाफसा होण्याची शक्यता नाही त्याचबरोबर या पिकांना कोणतीही उपाययोजना करणे शक्य नसल्याने यंदाचा खरिप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थांचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे दिवसभर सूर्यदर्शनही होत नाही. या पावसामुळे ग्रामीण भागात रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

तसेच पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. अनेक रस्त्यांच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत राहील्याने वाहतूकीत अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाबरोबर पुूलाची उंची वाढवून आगामी पावसाळ्यात निर्माण होणारा अडथळा दुर करता येईल असी मागणी जोर धरीत आहे. त्याचबरोबर पिकांच्या झालेली वाताहत पाहता शेतकरी वर्गातून या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Marathwada Jalna Heavy Rain Continues Crop

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwadacrops