esakal | Marathwada: जालन्यात बरसल्या रिमझिम सरी : पावसाची धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

rain

जालन्यात बरसल्या रिमझिम सरी : पावसाची धास्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जालना शहरात शुक्रवारी (ता.एक) दुपारी तसेच रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात पावसामुळे आधीच शेतशिवारात मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ढग दाटून येताच ठिकठिकाणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यात गतमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणी आहे. असे असताना शुक्रवारी पुन्हा जालना शहरात रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत कडक उन्ह होते. मात्र,दुपारनंतर आकाशामध्ये ढग दाटून आल्याने पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर पावसाने उघडीप दिली.रात्री पुन्हा पाऊस सुरु झाला. वीज पुरवठाही खंडीत झाला होता. दरम्यान, घनसावंगी, परतूर, मंठा शहरातही पावसाची रिमझिम झाली.

हेही वाचा: बेळगाव : झोपलेल्या ठिकाणीच रक्ताची उलटी होऊन कामगाराचा मृत्यू

वडीगोद्री परिसरात पाऊस

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यात नालेवाडी, टाका, रामगव्हाण आदी ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अंतरवाली सराटी भागात पाऊस झाला. त्यामुळे सुखी नाल्याला पाणी आले. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस आदी पीक धोक्यात आली आहे.

आष्टीत पावसाचा तडाखा

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने तडाखा दिला. मागील महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने हाहाकार केल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या दोन दिवस उघाड दिल्याने कसेबसे पीक हाती लागेल या आशेने तयारी करताच शुक्रवारी सायंकाळी अचानक पाऊस पडला.

loading image
go to top