मराठवाडा, खानदेशात 94 कोटींचा ऑनलाइन वीजबिल भरणा

Mahavitaran
Mahavitaran

औरंगाबाद - महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा व खानदेशातील 11 जिल्ह्यांतील 5 लाख 31 हजार 960 वीज ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात तब्बल 94.22 कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरले. जुलै महिन्यापेक्षा ऑनलाइन वीजबिल भरण्यात 66 हजार 884 ग्राहक, तर रकमेत तीन कोटी 31 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसह जळगाव, धुळे, नंदुरबार या खानदेशातील तीन जिल्ह्यांचा सामावेश आहे. वीजग्राहकांना कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून घरबसल्या वीजबिल भरण्याची ऑनलाइन सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांचेही बिल भरण्याची सेवाही उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची गरज राहिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com