मराठवाडा, खान्देशात पकडल्या वीस हजार चोऱ्या

मराठवाडा, खान्देशात पकडल्या वीस हजार चोऱ्या

औरंगाबाद : महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा आणि खान्देशामध्ये वर्षभरात तब्बल 19 हजार 844 वीज चोऱ्या उघड केल्या आहेत. या वीजचोरांकडून सहा कोटी दोन लाख रुपये वसुल करण्यात आले असून, 166 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदूरबार, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या 11 जिल्हयात गेल्या वर्षभरात एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहिम राबविण्यात आली. यात औरंगाबाद परिमंडलात 9, 668 वीज चोऱ्या पकडून 2 कोटी 25 लाख 18 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. व 129 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

जळगाव परिमंडलात 5,044 वीज चोऱ्या पकडून 2 कोटी 34 लाख 88 हजार रूपये दंड वसूल करत 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूर परिमंडलात 3,512 वीज चोऱ्या पकडून 94 लाख 89 हजार रूपये दंड वसूल करत 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. नांदेड परिमंडलात 1,620 वीज चोऱ्या पकडून 47 लाख 43 हजार रूपये दंड वसूल करत 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com