मराठवाड्याच्या मक्‍याची रशियाला गोडी!

आदित्य वाघमारे
रविवार, 6 जानेवारी 2019

औरंगाबाद - पैठणमध्ये उभारण्यात आलेल्या मेगा फूड पार्कमध्ये प्रक्रिया करण्यात आलेल्या मधुमक्‍याची गोडी रशियन बाजारपेठांना लागली आहे. येथून गेल्या दोन महिन्यांत पाचशे टन मधुमका रशियाला निर्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मका पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड आदी भागांतील आहे. 

पैठण येथे केंद्रीय अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या मेगा फूड पार्कने मक्‍याची जोरदार ऑर्डर पटकावली आणि ती पूर्णही केली जात आहे. वर्षाचा बराच काळ थंडी असलेल्या रशियाच्या बाजारपेठांना पैठण मेगा फूड पार्कमध्ये प्रक्रिया केला जाणारा मधुमका पसंतीस पडला आहे. दोन महिन्यांपूर्वी मिळालेल्या या ऑर्डरच्या माध्यमातून पाचशे टन मधुमका रशियाकडे पाठवण्यात आला. 

उणे अठरा अंशांवर साठवणूक 
फूड पार्कच्या उद्‌घाटनापूर्वीच मका प्रक्रिया प्रकल्पावर काम सुरू झाले होते. परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे देऊन त्यांच्याकडून पीक विकत घेण्याचे काम हे पार्क करते आहे. मक्‍याचे दाणे वेगळे करण्यासाठी पाचशे महिलांना रोजगार देणाऱ्या या फूड पार्कमध्ये उणे १८ अंशांमध्ये हजारो टन अन्न साठविण्याची सोय असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य झाले आहे.

Web Title: Marathwada Maize Demand in Rasia