मराठवाड्यातील दूध संकलनात 24 हजार लिटरची घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

मराठवाड्यातील रोजच्या दूध संकलनात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलअखेर 24 हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील दररोजच्या दूध संकलनात कमी अधिक प्रमाणात घट नोंदली गेली आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यातील रोजच्या दूध संकलनात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलअखेर 24 हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील दररोजच्या दूध संकलनात कमी अधिक प्रमाणात घट नोंदली गेली आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांची होणारी आबाळ हे यामागील प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

मार्च 2019 अखेर मराठवाड्यात प्रतिदिन 10 लाख 84 हजार लिटर दूध संकलन केले गेले. एप्रिलअखेर दररोजच्या दूध संकलनाची गती 10 लाख 60 हजार लिटरवर आली आहे. चारा छावण्या असल्या तरी बहुतांश दूध उत्पादक जनावरे छावणीऐवजी दावणीलाच ठेवून त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे सर्वच चारा छावण्यांध्ये जनावरांना पुरेसा चारा मिळतो का हा प्रश्‍न आहे. पाणीटंचाईसुद्धा पशुपालकांच्या अडचणीत वाढ करणारी ठरली आहे.

Web Title: Marathwada Milk Collection Decrease