मराठवाड्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लावली आहे.  त्यानुळे शेतकरी सुखावला आहे.

परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण
जिल्ह्यातील पुर्णा वगळता बहुतेक तालुक्यात शुक्रवारी (ता.९) ढगाळ वातावरण आहे. पूर्णेत सकाळ पासून मेघगर्जने सह दमदार पाऊस सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी पुर्णा तालुका वगळता सर्व तसलुक्यात ढगाळ वातावरण आहे. पूर्णेत सकाळी ८ वाजल्या पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुर्णा शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. उर्वरित गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू तालुक्यात सकाळ पासून सूर्य दर्शन झाले नाही.

मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लावली आहे.  त्यानुळे शेतकरी सुखावला आहे.

परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण
जिल्ह्यातील पुर्णा वगळता बहुतेक तालुक्यात शुक्रवारी (ता.९) ढगाळ वातावरण आहे. पूर्णेत सकाळ पासून मेघगर्जने सह दमदार पाऊस सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी पुर्णा तालुका वगळता सर्व तसलुक्यात ढगाळ वातावरण आहे. पूर्णेत सकाळी ८ वाजल्या पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुर्णा शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. उर्वरित गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू तालुक्यात सकाळ पासून सूर्य दर्शन झाले नाही.

हिंगोलीत पावसाची हजेरी कायम
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. शुक्रवारी ( ता८ ) सकाळ पासून जिल्हयात सर्वदूर पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली गेल्या चोवीस तासात कळमनुरी तालुक्यातील नंदापुर मंडळामध्ये सर्वात जास्त 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आंबा 43, आखाडाबाळापुर 41, कुरूंदा 40 , गिरगाव 37 डोंगरकडा 25, वारंगा 22, टेंभुर्णी 19, हयातनगर 18 कळमनुरी १६ बासंबा 13, सिरसम 12, वसमत मंडळात 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरात शुक्रवारी ( ता८ ) सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नाले भरून वाहू लागल्या असून नद्यांनाही थोड्याफार प्रमाणात पाणी आले आहे. शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी धावपळ सुरू केली आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाची झड
नांदेड शहर व जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गुरूवारी रात्री व शुक्रवारी (ता.८) सकाळी पावसाची झड लागून राहिली आहे.नायगाव तालुक्यात अजूनही झड पाऊस चालूच आहे. मारतळा परिसरात पहाटे जोरदार पाऊस झाला.

उमरी तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस चालूच आतापर्यत झिमझिम पाऊस चालुच आहे. या शिवाय गडगा परिसरात रात्रीपासून सुरू असलेला रिमझिम पाऊस थांबलेला नाही. धर्माबाद तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. आज सकाळपासून पाऊस थांबला. ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
विकास गाढवे
जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून गुरूवारी (ता. सात) रात्री व शुक्रवारी (ता. आठ) पहाटे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या सर्वदूर भागात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील एकुण ५३ महसूल मंडळापैकी एकेवीस मंडळात अतिवृष्टी झाली. गुरूवारी (ता. सात) मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता. या काळात जिल्ह्यात सरासरी ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १५४ मिलिमीटर पाऊस मदनुसरी (ता. निलंगा) मंडळात झाला आहे. एकूणच तीन दिवसाच्या पावसाने सरासरीची शंभरी गाठली आहे.

जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यात सोमवारी (ता. चार) पावसाने निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार हजेरी लावली. एकाच दिवशी जिल्ह्यात बारा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर एक दिवस विश्रांती देत पावसाने बुधवारपासून (ता. १३) जोरदार हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरवात झाली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाची हजेरी गुरूवारी रात्रीही कायम राहिली. बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला होता. त्यानंतर गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटेही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तीन दिवस सरासरीपैकी १०५ मिलिमीटर पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या तेरा टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक औसा तालुक्यात ९८ मिलिमीटर तर सर्वात कमी १८ मिलिमीटर पाऊस जळकोट तालुक्यात झाला आहे. औसा तालुक्यातील सर्व सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यानंतर निलंगा तालुक्यात ९२, लातूर - २७, रेणापूर - २०, अहमदपूर - ३९, चाकूर - ४९, उदगीर - ७२, देवणी - ७० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निलंगा ते किल्लारी रस्त्यावर असलेल्या एका ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतुक बंद पडली आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाचे वातावरण असून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

बीड जिल्ह्यात तीन तालुक्यांत पावसाची हजेरी
बीड - जिल्ह्यात गुरुवार पासूनन शुक्रवारच्या सकाळ पर्यंत तीन तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. परळी, केज व अंबाजोगाई या तालुक्यांत मिळून २०.२६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

यंदा सुरुवातीपासून सर्वच तालुक्यांत पावसाने कमी - अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६.६३ टक्के एवढा पाऊस झाला आहे. ता. एक जुन ते आठ जुनच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १२९.४६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ४४.२० मिमी एवढा पाऊस झाला असून वार्षिक सरासरी ६६६.३६ च्या तुलनेत सरासररी ३४.१४ एवढा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ३९.३० मिमी पाऊस झाला होता.

तीन तालुक्यांत हजेरी
दरम्यान, गुरुवार पासून शुक्रवार सकाळ पर्यंत केज, अंबाजोगाई व परळी या तीन तालुक्यांत पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यात सर्वदुर पाऊस झाला. या तालुक्यात सर्वाधिक पाऊस घाटनांदूर महसूल मंडळात (२० मिमी) झाला. केज तालुक्यात यूसूफवडगाव, होळ व बनसारोळा महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. परळी तालुक्यात परळीसह नागापूर व धर्मापूरी या महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. परळी मंडळात चांगला पाऊस झाला.

Web Title: marathwada monsoon rain