भीमा- कोरेगावचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात; बाजारपेठा बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

उमरगा, मुरुम, कळंब शहरातील बाजारपेठांमध्ये तरुणांच्या गटाने सकाळी फिरून दुकाने बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांना आवाहन केले. उमरगा येथे सकाळी नऊपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मुरुम शहरात सकाळी अकराच्या सुमारास तरुणांच्या गटाने घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर मुरुममधील बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली

उस्मानाबाद - भीमा- कोरेगाव (जि. पुणे) येथील प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून, जिल्ह्यातील उमरगा, कळंब, मुरुम या शहरांतील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.

उमरगा, मुरुम, कळंब शहरातील बाजारपेठांमध्ये तरुणांच्या गटाने सकाळी फिरून दुकाने बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांना आवाहन केले. उमरगा येथे सकाळी नऊपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मुरुम शहरात सकाळी अकराच्या सुमारास तरुणांच्या गटाने घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर मुरुममधील बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली.

कळंब येथेही काही तरुणांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या तिन्ही शहरांतील दुकाने बंद करण्यात आली.

Web Title: marathwada news: agitation