हजारो भाविकांनी घेतले मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

आष्टी - आद्यनाथ मच्छिंद्रनाथ यांच्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्‍यातील श्रीक्षेत्र मढी सावरगाव (मायंबा) येथे हजारो भाविकांनी शनिवारी (ता. २६) दर्शनासाठी गर्दी केली होती. 

आष्टी - आद्यनाथ मच्छिंद्रनाथ यांच्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्‍यातील श्रीक्षेत्र मढी सावरगाव (मायंबा) येथे हजारो भाविकांनी शनिवारी (ता. २६) दर्शनासाठी गर्दी केली होती. 

आष्टी तालुक्‍यातील सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. ऋषिपंचमीला मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा असतो. यानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे गडाचे विश्वस्त व माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते समाधीची महापूजा व महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनास खुले करण्यात आले. सकाळी आठ वाजता नवनाथ ग्रंथ पारायणास प्रारंभ झाला. अकरा वाजण्याच्या सुमारास नाथांचा घोडा व मानाचे निशाण यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये राज्यभरातून आलेले भाविक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्याने गर्भगिरी परिसर दुमदुमून गेला होता. अलख निरंजन, मच्छिंद्रनाथ महाराज की जय, बडे बाबा की जय, हरहर महादेव असा जयघोष करीत भाविकांनी मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले. 

Web Title: marathwada news asti Machhindranath

टॅग्स