लक्‍झरी बस-कारच्या धडकेत मुंबई काँग्रेसचे प्रदेश सचिव ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कायगाव (जि. औरंगाबाद) - लक्‍झरी बस व कारच्या अपघातात मुंबई काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय लक्ष्मीकांत चोपाने (वय 60) जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा (ता. गंगापूर) येथे रविवारी (ता. 13) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. 

औरंगाबाद येथे इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रम आटोपून कॉंग्रेसचे पदाधिकारी कारने (एमएच-43 एबी-22) परतत असताना भेंडाळा फाटा येथील ज्ञानेश्‍वर पेट्रोलियम पंपासमोरून एक दुचाकी अचानक मध्ये आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्ता दुभाजकाला आदळली आणि विरुद्ध दिशेने नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या लक्‍झरी बसला (एमएच-30 एए-9111) जाऊन धडकली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला तसेच लक्‍झरी बसच्या केबिनचे नुकसान झाले. अपघातात संजय चोपाने ठार झाले, तर ठाणे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर (वय 45), कॉंग्रेस प्रदेश सचिव रमाकांत म्हात्रे (वय 50), दलजीत सिंह बिस्त (वय 50) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंगापूर पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थली येऊन क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला उभी केली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

Web Title: marathwada news aurangabad Luxury bus-car accident