विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

किल्लेधारूर - शेतात बोअर घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तालुक्‍यातील वाघोली येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. एक) पोलिस ठाण्यात पती, दीर, सासू-सासरा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. 

वाघोली येथील चिंगूबाई श्रीराम गव्हाणे (वय ३१) हिने तक्रारीत म्हटले आहे, की वडील नसल्याने आईने एक लाख रुपये आणि अंगठी घालून २००७ मध्ये लग्न करून दिले. लग्न झाल्यानंतर दोन मुले झाली. पती श्रीराम, सासरा शेषराव, सासू शालनबाई व दीर ज्ञानोबा गव्हाणे हे शेतात बोअर घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून ठार मारण्याच्या धमक्‍या देत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन केळे तपास करीत आहेत.

Web Title: marathwada news crime

टॅग्स