यंदाही दुष्काळाच्या उंबरठ्यावर...

सुभाष बिडे
रविवार, 30 जुलै 2017

घनसावंगी - गेल्या एक महिन्याच्या कालावधीपासून पावसाचा थांगपत्ता नाही. मागील वर्ष सोडता चार ते पाच वर्षांपासून  यंदाही पावसाने दगा दिला. सततच्या दुष्काळाच्या उबरंठ्यावर असल्याने शेतकरी आता चिंतातुर झाला आहे. 

घनसावंगी - गेल्या एक महिन्याच्या कालावधीपासून पावसाचा थांगपत्ता नाही. मागील वर्ष सोडता चार ते पाच वर्षांपासून  यंदाही पावसाने दगा दिला. सततच्या दुष्काळाच्या उबरंठ्यावर असल्याने शेतकरी आता चिंतातुर झाला आहे. 

वर्ष २०१२ मध्ये पावसाचे प्रमाण कमी, हीच परिस्थती मागील वर्ष सोडता पावसाने जोर धरलाच नाही. डिसेंबर २०१४ आणि जानेवारी २०१५ या महिन्यात कधी अवकाळी तर गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघू शकला नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत आले.  यातून सावरत शेतकऱ्यांनी यंदा मृगात पाऊस येताच पेरणी केली; मात्र पावसाने पुन्हा दगा दिला.  एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी पावसाचा अद्याप थेंब नाही. पिके कोवळी आहेत. उष्ण वारे वाहत असल्यामुळे ते कोमेजत आहे. पाण्याअभावी पिके करपत आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी पिके करपत आहेत. जमिनीवरील जलपातळी खोल गेली आहे.  पिकांची वाढ खुंटली आहे. अजूनही काही दिवस पाऊस पडला नाही तर पिके जागीच वाळल्याशिवाय राहणार नाहीत.  

यंदाही उत्पादन घटणार 
शेती व्यवसाय हा नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. सरासरी शंभर दिवस पाऊस पडला तरच खरिपातील पिके तग धरतात; परंतु मागील वर्षी  चांगला पाऊस झाला. 

यंदा जून संपूर्ण आणि जुलैही संपत आहे तरीही पाऊस झाला नाही त्यामुळे यंदाही शेतीत उत्पादन घटणार आहे. 
 

किडीचे आक्रमण, वन्यप्राण्यांचा उपद्रव
सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी तुषार, ठिबकद्वारे पिकांना पाणी देत आहेत. कसे तरी पिके जगविली जात आहे; परंतु कोवळ्या पिकांवर विविध किडीचे आक्रमण होत आहे, तसेच उरलेसुरली पिके वन्य प्राणी फस्त करीत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस होत नाही. मात्र शेतकरी आगामी काळात पाऊस होईल या आशेवर कमी जास्त ओलीवर पेरणी करतो. दरवर्षी पेरणीचे गणित चुकत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसानंतर पेरणी केली पाहिजे; परंतु सध्याच्या परिस्थितीत आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप पिकांवर संकट ओढवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- संजय लोंढे, कृषी सहायक, घनसावंगी 

पावसाविना कोवळी पिके करपू लागली आहेत. खरीप हंगाम हगाम वाया गेल्यावर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दरवर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे संकट ओढावत आहे. दुबार पेरणीमुळे आवश्‍यक उत्पन्नही मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे.
- भगवान मोहिते, शेतकरी, घनसावंगी

Web Title: marathwada news drought