पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम सुरु करा

नवनाथ इधाटे 
गुरुवार, 22 मार्च 2018

फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत दोन वेळेस त्यांच्या घरांचा सर्वे करून दोनशे रुपये घेण्यात आल्याची तक्रार चक्क पेंडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेली आहे. पैसे घेऊनही अद्याप घरकुलाचे काम सुरु झालेले नाही.

फुलंब्री : पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलाचे काम तत्काळ सुरु करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी पेंडगाव आळंद (ता.फुलंब्री) येथील उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संगीता चव्हाण यांच्याकडे बुधवारी (ता.21) निवेदनाद्वारे केली आहे.

येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या गावात कोणीही मागास प्रवर्गात मोडत नाही त्यामुळे येथील सरपंच पद रिक्त असून सरपंचाचा संपूर्ण कारभार उपसरपंचाकडे सोपविण्यात आलेला आहे.  सदरील निवेदनात म्हंटले आहे कि, पेंडगाव आळंद येथे पंतप्रधान आवास योजनेतील चार घरकुल हे दोन वर्षापासून मंजूर असून आतापर्यंत त्या घरकुलांना कार्यरंभ आदेश देण्यात आलेले नाही. संबंधित घरकुला लाभार्थी यांच्या घरात कर्ता पुरुष नसून लाभार्थी ही विधवा महिला आहे.

फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत दोन वेळेस त्यांच्या घरांचा सर्वे करून दोनशे रुपये घेण्यात आल्याची तक्रार चक्क पेंडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेली आहे. पैसे घेऊनही अद्याप घरकुलाचे काम सुरु झालेले नाही. येत्या आठ दिवसांत सदरील घरकुलाचे बांधकाम सुरु करण्याचे पत्र देण्यात यावे. अन्यथा एक एप्रिल पासून सर्व लाभार्थी तहसील कार्यालयासमोर उपोषनास बसणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या निवेदानावर उपसरपंच महादू डकले, बाबुराव डकले, अशोक व्यवहारे, रामेश्वर व्यवहारे, नारायण व्यवहारे, गणपत व्यवहारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

● दोन वर्षपासून पंतप्रधान घरकुलाची वाट पाहणारे लाभार्थी ●
● तुळसाबाई भगवान व्यवहारे
● गजराबाई मुक्ताची व्यवहारे
● कस्तुरांबाई एकनाथ डकले 
● कौसाबाई शामराव व्यवहारे 

Web Title: Marathwada news gharkul scheme in phulambri