K-OK marathwada news jalna Farm pond जिल्ह्यात चार हजार ८२४ शेततळे | eSakal

जिल्ह्यात चार हजार ८२४ शेततळे

भास्कर बलखंडे
बुधवार, 17 जानेवारी 2018

जालना - गेल्या पाच वर्षांपासून जिल्हाभरात अल्पसा पाऊस होत असल्यामुळे दुष्काळी चित्र निर्माण झाले आहे. त्यावर प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीने मात करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. जिल्ह्यात पाणीपातळी वाढविण्यासाठी मागेल त्याला शेततळे हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ६ हजार शेततळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ४  हजार ८२४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ९५३ कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.

जालना - गेल्या पाच वर्षांपासून जिल्हाभरात अल्पसा पाऊस होत असल्यामुळे दुष्काळी चित्र निर्माण झाले आहे. त्यावर प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीने मात करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. जिल्ह्यात पाणीपातळी वाढविण्यासाठी मागेल त्याला शेततळे हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ६ हजार शेततळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ४  हजार ८२४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ९५३ कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली. ही कामे लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. शेततळ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर हक्‍काचे पाणी उपलब्‍ध होत आहे. त्‍यामुळे बागायती शेतीला चालना मिळत आहे.

‘जलयुक्त’तूनही पाणी जिरविण्याचे प्रयत्न 
याशिवाय जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरात मोठी कामे सुरू आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

मागेल त्याला शेततळे
जिल्ह्यात पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, ते जागेवरच जिरविण्यासाठी मागेल त्याला शेततळे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सहा हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे निर्माण करावेत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४  हजार ८२४ शेततळी पूर्ण झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अडवून ते जिरविण्यास मदत होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत निश्‍चितपणे पाणीपातळी वाढून उत्पादनात वाढ होऊ शकेल, असा विश्वास कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ९५३ शेततळ्यांची कामेही वेगात सुरू आहेत. मार्च २०१८च्या अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: marathwada news jalna Farm pond