जलयुक्त शिवारसाठी आठ कोटींची मदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

औरंगाबाद  -श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (प्रभादेवी) मुंबई यांच्याकडून मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी प्रति जिल्हा एक कोटी याप्रमाणे आठ कोटी रकमेचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोमवारी (ता.19) सुपूर्द केला. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत हा धनादेश देण्यात आला. 

औरंगाबाद  -श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (प्रभादेवी) मुंबई यांच्याकडून मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी प्रति जिल्हा एक कोटी याप्रमाणे आठ कोटी रकमेचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोमवारी (ता.19) सुपूर्द केला. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत हा धनादेश देण्यात आला. 

संस्थानचे विश्‍वस्त हरीश सणस, रोहयोचे उपायुक्त अनंत कुंभार, औरंगाबाद महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती. यानंतर डॉ. भापकर यांनी सदर धनादेश प्रति जिल्हा एक कोटी रुपये या प्रमाणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. या वेळी संस्थानचे अध्यक्ष राणे म्हणाले, ""सदर अभियानास निधी उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देऊन निधी उपलब्ध करून देण्याचा श्री गणेशा श्री सिद्धिविनायक न्यासाने केला. सर्वप्रथम महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना प्रति जिल्हा एक कोटीप्रमाणे 34 कोटी इतके अर्थसहाय्य मार्च व एप्रिल 2015 मध्ये वितरित केले. त्यानंतर मार्च 2016 मध्ये प्रति जिल्हा 19 लाख 11 हजारप्रमाणे 34 जिल्ह्यांना 6 कोटी 50 लक्ष इतके अर्थसहाय्य वितरित केले,'' अशी माहिती त्यांनी दिली. 

विभागीय आयुक्त भापकर म्हणाले, ""मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांत जलयुक्त शिवारचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. एकूण मराठवाडा विभागात जलयुक्त शिवार अभियानावर 84.65 टक्के खर्च झाला आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवारच्या कामांसाठी 40 गावांची निवड करण्यात आली असून, 324 कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी 273 कामे पूर्ण झाली आहेत. 29 कामे सध्या सुरू असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत''. संस्थानचे विश्‍वस्त सणस म्हणाले, ""या अभियानांतर्गत शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यासाठी 27 जिल्ह्यांना प्रति जिल्हा एक कोटी याप्रमाणे 27 कोटी एवढा निधी न्यासाकडून वितरित करण्यात येणार आहे. अशाप्रकारे "जलयुक्त शिवार' या राज्य शासनाच्या महत्त्वांकाक्षी योजनेस एकूण 67 कोटी 50 लाख इतका निधी न्यासाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.'' 

Web Title: marathwada news jalyukt shivar