जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

उमेश वाघमारे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जालना जिल्ह्याकडे पावसाने पाठफिरवल्या संपूर्ण  खरिप शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर होता.पावसाअभावी दुबार पेरणी करूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनवर नगर फिरवला. तर तूर आणि कापसाच्या पिकांची परिस्थितीही जेमतेम होती.

जालना : मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने रविवारी (ता.20) जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये शनिवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली होती.

जालना जिल्ह्याकडे पावसाने पाठफिरवल्या संपूर्ण  खरिप शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर होता.पावसाअभावी दुबार पेरणी करूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनवर नगर फिरवला. तर तूर आणि कापसाच्या पिकांची परिस्थितीही जेमतेम होती. मात्र जिल्ह्यात शनिवारपासून सुरु झालेला सर्वदूर पाऊस हा तूर, कापूस पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे. दरम्यान जिल्ह्याती सात माध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 23 टक्के पाणीसाठा शिल्क होता. या पावसाने प्रकल्पमधील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल अशी आशा आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात म्हणजे, जालना, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, बदनापूर, भोकरदन तालुक्यात  पावसाची रिपरिप सुरु आहे. तर जाफराबाद शहरामध्ये दुपारनंतर पावसाने उगडीप दिली आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathwada news rain in Jalna