जालन्यातील 25 मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सोमवारी (ता.21) सकाळी 8 वाजेपर्यंत जालना तालुक्यात 57.13 मिमी, बदनापूर तालुक्यात 32 मिमी, भोकरदन तालुक्यात 26.75 मिमी, जाफराबाद तालुक्यात 26.80 मिमी, परतूर तालुक्यात 98.20 मिमी, मंठा तालुक्यात 84.25 मिमी, अंबड तालुक्यात 128.86 मिमी, घनसावंगी तालुक्यात 95.71 मिमी पाऊसाची नोंद झाली.

जालना : जिल्ह्यात रविवारी दिवसभर आणि रात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 25 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर अंबड तालुक्यात सर्वाधिक 128.86 मिमी तर  भोकरदन तालुक्यात 26.75 मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, रविवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता.21) सकाळी 8 वाजेपर्यंत जालना तालुक्यात 57.13 मिमी, बदनापूर तालुक्यात 32 मिमी, भोकरदन तालुक्यात 26.75 मिमी, जाफराबाद तालुक्यात 26.80 मिमी, परतूर तालुक्यात 98.20 मिमी, मंठा तालुक्यात 84.25 मिमी, अंबड तालुक्यात 128.86 मिमी, घनसावंगी तालुक्यात 95.71 मिमी पाऊसाची नोंद झाली. दरम्यात सोमवारी सकाळी पासून पावसाने विश्रांती घेतली असून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

अतिवृष्टी झालेले  तालुका निहाय मंडळे
जालना - जालना ग्रामीण ८९.००, विरेगाव ८५.००, पाचन वडगाव ६५.००
परतूर - परतूर १२८.००, सातोना १०७.००,  आष्टी ७३.००, श्रीष्टी १३८.००
मंठा -  मंठा ९९.००, ढोकसाळ ७२.००, पांगरी गोसावी ११८.००, 
अंबड -. अंबड १३४.००, धनगर पिंप्री १३१.००, जामखेड १३८.००, वडीगोद्री १३८.००, गोंदी १२६.००, रोहीलागड ११८.००, सुखापुरी ११७.००
घनसावंगी -  घनसावंगी ९५.००, राणी उंचेगाव १००.००, रांजनी १२६.००, तिर्थपुरी १०५.००, कुंभार पिंपळगाव ९०, अंतरवाली टेंभी ७६, जांब समर्थ ७८ मिमि

Web Title: Marathwada news rain in Jalna