लातूर जिल्ह्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

विकास गाढवे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पावसाने ओढ दिल्याने खरीपातील पिकांवर मोठा परिणाम झाला होता. पिके कुठे सुकून तर कुठे जाग्यावर वाळून गेली होती. या पावसाने पिकांना मोठे जीवदान मिळाले असले तरी उत्पादनावर परिणाम होणार आहे. एकाच दिवसाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

लातूर : जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. 19) पावसाने जोरदार हजेरी लावली. तीन महसुल मंडळाचा अपवाद सोडला तर बाकी 55 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरीपातील पिकांवर मोठा परिणाम झाला होता. पिके कुठे सुकून तर कुठे जाग्यावर वाळून गेली होती. या पावसाने पिकांना मोठे जीवदान मिळाले असले तरी उत्पादनावर परिणाम होणार आहे. एकाच दिवसाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाची पुन्हा जोमदार सुरुवात झाल्याने शेतकरी समाधानी आहे.

या पावसाने खरीपातील काही पिके हाती लागतील, अशी आशा त्यांना आहे. चाकूर ते येरोळमोड रस्त्यावरील दोन पुलावरुन पाणी वहात असल्याने वहातुक बंद झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे 
लातूर -    150.00
कासारखेडा -    42.00
गातेगांव     - 127.00
तांदुळजा -    77.00
मुरूड -    105.00
बाभळगाव -    110.00
हरंगुळ बु. -    62.00
चिंचोलि ब.     -74.00
-----------
औसा    - 171.00
लामजना -     125.00
किल्लारी -    132.00
मातोळा     - 99.00
भादा    - 130.00
किनिथोट -    150.00
बेलकुंड -    117.00
----------
रेणापूर    - 106.00
पोहरेगांव    - 134.00
कारेपुर     - 84.00
पानगाव     - 97.00
-----------
उदगीर -    97.00
मोघा -    118.00
हेर -    126.00
देवर्जन -    95.00
वाढवणा बु.    - 91.00
नळगीर -     55.00
नागलगाव    - 75.00
--------
अहमदपूर    - 103.00
किनगांव    - 81.00
खंडाळी -    90.00
शिरूर ताजबंद - 115.00
हाडोळती -     85.00
अंधोरी -    85.00
--------
चाकुर     - 112.00
वडवळ ना.     - 131.00
नळेगांव - 151.00
झरी बु. -    104.00
शेळगाव    - 114.00
---------
जळकोट -    85.00
घोणसी -     77.00
---------
निलंगा    - 125.00
अंबुलगा बु. -    140.00
कासारशिरसी -    62.00
मदनसुरी -    76.00
औराद शहाजानी -    115.00
कासारबालकुंदा -    60.00
निटुर    - 145.00
पानचिंचोली -    146.00
---------
देवणी -    137.00
वलांडी -    142.00
बोरोळ    - 38.00
---------
शि.अनंतपाळ    - 102.00
हिसामाबाद    - 117.00
साकोळ     - 105.00

Web Title: Marathwada news rain in Latur