परभणी जिल्ह्याला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

यंदा पावसाळा समाधानकारक असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते.त्याची प्रचीती मान्सूनच्या आगमनाआधीच येत आहे. संपूर्णा राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यापूर्वीच मराठवाड्यात दमदार पावसाने ठाण मांडले आहे.

परभणी - सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे नदीनाले भरुन वाहू लागले आहेत. पूर्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने रहाटी बंधाऱ्यातून पाणी पुढे झेपावले. आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास जिल्ह्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडलेल्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे.

यंदा पावसाळा समाधानकारक असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते.त्याची प्रचीती मॉन्सूनच्या आगमनाआधीच येत आहे. संपूर्ण राज्यात
मॉन्सून सक्रीय होण्यापूर्वीच मराठवाड्यात दमदार पावसाने ठाण मांडले आहे. परभणी जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पटापट अंतिम मशागत करुन पेरणीची पूर्ण तयारी केली आहे. काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरणीलाही सुरुवात झाली आहे. आता रविवारी आणि सोमवारी झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच शेतकरी पेरणीला सुरवात करणार आहेत. रविवारी दिवसभर सर्वच तालुक्यात कमी-अधीक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. रात्रीही रिमझिम स्वरुपाचा पाऊस येत होता. आज सकाळपासून सुर्यदर्शन झाले नसल्याने अंधार पडला होता.

दुपारी एकच्या सुमारास परभणी शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. वारे नसले तरी विजांचा कडकडाट सुरु होता. तुफान स्वरुपाच्या पावसामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते.त्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच झाले. शहरातील रस्ते, नाल्या भरुन वाहत होते.नारायण चाळ, गांधी पार्क,शिवाजी चौक येथे गुडघाभर उंच पाणी वाहु लागल्याने वाहतुक थांबली होती. वकील कॉलनीतून पाण्याचा मोठा लोंढा पाऊस उघडल्यानंतरही तासभर सुरु राहिल्याने बिएसएनल कार्यालयासमोरुन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता काही वेळासाठी बंद झाला होता. बसस्थानक परिसरातही डिग्गी नाला भरुन वाहील्याने मुख्य रस्त्यावरुन पाणी वाहु लागले.जिल्ह्याच्या सर्वच भागात या पावसाने हजेरी लावली. पूर्णा शहरासह ग्रामीण भागात दुपारी 12च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. सोनपेठ, गंगाखेड, पालम या परिसरातही तासभर दमदार पाऊस झाला. जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत या तालुक्यानांही पावसाने झोडपले.

रहाटी बंधारा तुडूंब
परभणी शहराला पाणी पुरवठा करणारा रहाटी बंधारा दोन दिवसात झालेल्या पावसाने तुडूंब भरला आहे. मे महिण्यात या बंधाऱ्यात दुधना प्रकल्पातून सोडलेले पाणी गेल्या काही दिवसात कमी झाले होते. त्यामुळे नदीचे दोन्ही काठ रिकामे झाले होते मात्र दोन दिवसापासून दुधना नदीसह पूर्णा नदीच्या येलदरी धरणाखालील  पानलोट क्षेत्रात परभणी, जिंतूर तालुक्यात पाऊस होत असल्याने नदीच्या पात्रात पाणी आले आहे. हे पाणी रहाटी येथील बंधाऱ्यात सोमवारी पहाटे पोचले. सेलू तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने दुधना नदीतून पाणी पूर्णा नदीत येत आहे. त्यामुळे बंधारा भरुन वाहु लागला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
कुणब्याच्या पोरा असंच लढत जा, सरकारला वाकवत जा !
पाक सैन्याकडून 1 जूनपासून नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
विजय मल्ल्यांची 'चोर, चोर' म्हणत उडविली हुर्यो​
बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​

Web Title: Marathwada News rain in Parbhani