शेतीमित्र पुरस्कार चोबे कुटुंबीयांना प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

सिल्लोड - राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मंगळवारी (ता. ११) राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘सकाळ’चे सिल्लोड येथील दिवंगत बातमीदार राजेश चोबे यांना जाहीर झालेला ‘वसंतराव नाईक शेतीमित्र’ पुरस्कार त्यांच्या पत्नी संगीता चोबे, बंधू सचिन चोबे यांनी स्वीकारला.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री महादेव जानकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर आदी उपस्थित होते.

राजेश चोबे यांची शेतकरी व शेतीनिष्ठ पत्रकार अशी ओळख होती. शेती, शेतकऱ्यांनी केलेले यशस्वी प्रयोग, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी सातत्याने ‘सकाळ’मध्ये प्रकाशित केली. त्यातून अनेक शेतकऱ्यांना उभारी मिळाली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या कृषी विभागाने त्यांची २०१४ वर्षीच्या वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारासाठी निवड केली. दरम्यान, मार्च २०१६ मध्ये राजेश चोबे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे हा पुरस्कार चोबे कुटुंबीयांनी स्वीकारला.

Web Title: marathwada news Rajesh Chobe award