नांदेड विभागामध्ये एक कोटी टन ऊस गाळप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

उस्मानाबाद - साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, महिनाअखेरपर्यंत कारखाने उसाचे गाळप बंद करतील अशी शक्‍यता आहे. सद्यःस्थितीत नांदेड विभागात एक कोटी टनापर्यंत उसाचे गाळप झाले आहे. सरासरी साडेदहा टक्के उतारा मिळाल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी स्थितीनंतर शेतकऱ्यांना तसेच कारखानदारांना या हंगामात काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

नांदेड विभागामध्ये नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या तयारीने कारखाने ऊस गाळपासाठी प्रयत्नशील होते. परिणामी यंदा गाळप वाढल्याचे दिसले. अजूनही पंधरा दिवस कारखाने सुरू राहणार असल्याने ऊस गाळपात आणखी काही प्रमाणात वाढ होणार आहे. 

कारखान्यांची कामगिरी
जिल्हा    ऊस गाळप (टन)    साखर उत्पादन    साखर उतारा  
            (क्विंटल)        (टक्के)
परभणी    १५,६४,८२३    १५,८१,५७०    १०.११
हिंगोली    १०,२३,५१५    १०,९०,७२५    १०.६६ 
नांदेड    ११,३६,७९५    १२,१४,५७१    १०.६८       
उस्मानाबाद    ३३,८२,६११    ३४,१०,८३५    १०.०८
लातूर    २६,६६,४६०     ३०,७७,८६०     १०.९७
एकूण     ९९,१४,२०४     १०,३३,७५,५६१     १०.४७.

Web Title: marathwada news sugar nanded sugarfactory