मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ६३ तालुक्‍यांतील २६६ मंडळांमध्ये रविवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये कुठे रिमझिम, कुठे मध्यम, तर कुठे जोरदार पाऊस झाला. दरम्यान, रविवारी दुपारीही पाऊस झाला, त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे; मात्र धरणे तहानलेलीच आहेत. शिवाय, काही भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ६३ तालुक्‍यांतील २६६ मंडळांमध्ये रविवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये कुठे रिमझिम, कुठे मध्यम, तर कुठे जोरदार पाऊस झाला. दरम्यान, रविवारी दुपारीही पाऊस झाला, त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे; मात्र धरणे तहानलेलीच आहेत. शिवाय, काही भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आठ मंडळे, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ३८.३६, जालना १५.४२, नांदेड २३.१५, हिंगोली २४.१४, परभणी ५.२२ असा पाऊस झाला. लातूर १.५९, बीड १.७ आणि उस्मानाबाद ०.६७ या जिल्ह्यांत हलक्‍या पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Rain Water