मराठवाड्यातील रस्‍ते होणार हिरवेगार

मंगेश शेवाळकर
सोमवार, 2 जुलै 2018

हिंगोली - मराठवाड्यात तेरा कोटी वृक्षलागवड योजनेला रविवारपासून (ता. एक) सुरवात झाली असून, मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांमधून ६४ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये बारा हजार हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध आहे.

हिंगोली - मराठवाड्यात तेरा कोटी वृक्षलागवड योजनेला रविवारपासून (ता. एक) सुरवात झाली असून, मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांमधून ६४ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये बारा हजार हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध आहे.

मराठवाड्यात तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयासह आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वनअधिकारी यांनी पुढाकार घेऊन मराठवाड्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह विविध सेवाभावी संस्था व नागरिकांनाही सहभागी करून घेतले जात आहे. मराठवाड्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत कार्यालय व शाळा परिसरासोबतच गायरान जमिनीवर वृक्षलागवड केली जाणार आहे. या वृक्षलागवडीला रविवारपासून सुरवात झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांमधून बारा हजार ६९३ हेक्‍टर क्षेत्रांवर ६४ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी वनविभागाकडून रोपे देखील उपलब्ध केली जात आहेत.

अशी होणार वृक्षलागवड
जिल्हा      किलोमीटर     हेक्‍टर

औरंगाबाद    १० हजार ६२९     २ हजार १२३  
जालना    ९ हजार ८२      १ हजार ८११ 
परभणी    ५ हजार ३३२    १ हजार ६५  
हिंगोली    ३ हजार ९६०    ७९२ हेक्‍टर
नांदेड    ९ हजार १५१    १ हजार ८२७  
लातूर    ५ हजार ८०१    १ हजार १६० 
उस्मानाबाद    ७ हजार ९४७    १ हजार ५८८ 
बीड     १२ हजार १४९    २ हजार ३२७

Web Title: marathwada road Greenhorn tree plantation