"मसाप'चे लातूर शाखेला बळ

लातूर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेतर्फे कौतिकराव ठाले-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी के. एस. अतकरे, दादा गोरे, शेषराव मोहिते, नरसिंग इंगळे, प्रा. जयद्रथ जाधव आदी
लातूर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेतर्फे कौतिकराव ठाले-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी के. एस. अतकरे, दादा गोरे, शेषराव मोहिते, नरसिंग इंगळे, प्रा. जयद्रथ जाधव आदी

लातूर : साहित्य परिषदेच्या शाखा जिल्ह्या-जिल्ह्यांत तयार होतात; पण आर्थिक निधीअभावी त्या लगेच इतिहासजमाही होतात. असे चित्र मराठवाडा साहित्य परिषदेबाबत निर्माण होऊ नये म्हणून परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यरत शाखांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार लातूरमधील परिषदेच्या शाखेला आर्थिक निधी देण्यात आला आहे. यातून लातूरला दर्जेदार साहित्यविषयक उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे. 

शाखेचा कामाचा आढावा
मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूरमधील शाखेच्या कामांचा परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. परिषदेचे कुंडलिक अतकरे, दादा गोरे, ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, कवी नरसिंग इंगळे, शाखेचे अध्यक्ष प्रा. जयद्रथ जाधव, शैलजा कारंडे, विवेक सौताडेकर, नयन राजमाने, प्रकाश घादगिने आदी उपस्थित होते. ठाले-पाटील यांनी जाधव यांच्याकडे निधी सुपूर्द केला. 

दीड वर्षांपुर्वी पुनर्स्थापना
लातूरमध्ये दीड वर्षापूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेची पुनर्स्थापना करण्यात आली. त्यासाठी कौतिकराव ठाले-पाटील, शेषराव मोहिते यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी जयद्रथ जाधव यांची शाखेच्या अध्यक्षपदी निवड केली.

विविध उपक्रमांचे आयोजन

शाखा स्थापन झाल्यानंतर कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन, शिवार साहित्य संमेलन आदी उपक्रम लातूरमध्ये घेण्यात आले. याचा आढावा घेऊन वाचन संस्कृती वाढावी, यासाठी दर्जेदार साहित्यविषयक उपक्रम शाखेने आयोजित करावेत, त्यासाठी हा निधी देण्यात आला. अशा प्रकारचा निधी परिषदेच्या इतर जिल्ह्यांतील कार्यरत शाखांनाही दिला जात आहे, अशी माहिती ठाले-पाटील, अतकरे यांनी "सकाळ'ला दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com