मराठवाड्यात दमदार पावसाचा जोर कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नांदेडमध्ये अतिवृष्टी, ४२१ पैकी ५९ मंडळांत धुवाधार
औरंगाबाद - मराठवाड्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या चार दिवसांत जिल्हा, तालुका, मंडळ बदलले, मात्र अतिवृष्टी आणि संततधार पावसात सातत्य आहे. मंगळवारी (ता.१२) नांदेड जिल्ह्यात ७७.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ५९ मंडळात अतिवृष्टी झाली. यापैकी ५१ मंडळे एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी अर्धापूर, देगलूर, धर्माबाद आणि मुखेड हे चार तालुके वगळता उर्वरित १२ तालुक्‍यांमध्ये चोवीस तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.

बीड, लातूर, उस्मानाबादेत अद्यापही कमी पाऊस
गेल्या दोन-तीन वर्षांत मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला. आतापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहता, या तीन जिल्ह्यांत अद्यापही कमी पाऊस पडला आहे. या तीन जिल्ह्यांतील एकाही तालुक्‍यात वार्षिक सरासरी ४० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस पोचला नाही. उर्वरित मराठवाड्यातील १५ तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ४०-५० टक्के पाऊस पडला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका (४४.६ टक्के), वैजापूर (४२.८), जालना जिल्ह्यातील परतूर (४७.३), मंठा (४२.२), अंबड (४८.९), परभणी जिल्ह्यातील पूर्णा (४२.९), सेलू (४१.२), हिंगोलीतील कळमनुरी तालुक्‍यात (४४.१), नांदेडमधील अर्धापूर (५४.४), नांदेड (४९), भोकर (५८), लोहा (४४.५), माहूर (४५.६), हदगाव (५१.१), हिमायतनगर (५२.९).

Web Title: Marathwada strong rains continued