मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी 1994 रोजी नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. त्यानिमित्ताने आंबेडकर यांच्या अनुयायांनी आज विद्यापीठ गेटवर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. आंबेडकर यांच्या अनुयायांनी नामांतरासाठी तब्बल 17 वर्षे लढा दिला. शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले.
Web Title: Marathwada University naming day celebration