कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. येवले यांनी स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या "नॅक अ प्लस' दर्जाला ज्यामुळे हुलकावणी मिळाली, त्या वीक पॉइंटवर काम केले जाईल; तसेच विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यात येईल, अशी ग्वाही नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांनी दिली.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या "नॅक अ प्लस' दर्जाला ज्यामुळे हुलकावणी मिळाली, त्या वीक पॉइंटवर काम केले जाईल; तसेच विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यात येईल, अशी ग्वाही नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांनी दिली.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून डॉ. येवले यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. डॉ. येवले म्हणाले, 'औरंगाबादच्या विद्यापीठाची स्पर्धा इतर विद्यापीठांशी नसून जागतिक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणात्मक पुढे येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नागपूरप्रमाणे ऑनलाइन आणि पारदर्शक कारभारावर भर राहील. जबाबदारी ओळखून अधिकाराप्रमाणे योगदान दिल्यास नावलौकिक उंचावेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada University Vice Chancellor Pramod Yevale