अंभई परिसरात बहरली झेंडू फुलांची शेती

संजय कादी
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सिल्लोड तालुक्‍यातील अंभई परिसरात पिवळ्या, केसरी रंगाच्या झेंडू फुलांची शेती बहरली आहे. आगामी येणाऱ्या दसरा, दिवाळीत झेंडूला महत्त्व असते. यावेळी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात असून दिवाळी, दसऱ्यापर्यंत झेंडू पूर्णपणे तयार होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

अंभई (जि.औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्‍यातील अंभई परिसरात पिवळ्या, केसरी रंगाच्या झेंडू फुलांची शेती बहरली आहे. आगामी येणाऱ्या दसरा, दिवाळीत झेंडूला महत्त्व असते. यावेळी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात असून दिवाळी, दसऱ्यापर्यंत झेंडू पूर्णपणे तयार होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

यावर्षी सततच्या पावसाने मका, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, अद्रक पिके पिवळी पडून विविध रोगांच्या प्रादुर्भावाने नुकसान झाले आहे. पिकांवर केलेला खर्च निघतो की नाही? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आता शेतकऱ्यांची पूर्ण दारोमदार झेंडू फुलांवर येऊन ठेपली आहे. जळगाव, जामनेर, जालना, औरंगाबाद या ठिकाणचे व्यापारी अंभई परिसरातील झेंडू योग्य भाव देत आतापासूनच खरेदी करून नेत असल्याची माहिती अंभई येथील प्रगतिशील शेतकरी फय्याज देशमुख यांनी दिली.
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold Flowers Farming Flarish In Abhambai