esakal | झेंडूने बहरले आयुष्य, फुलशेतीतून दोन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

0zendu_20phool

सततचा दुष्काळ. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीव्यवसाय कायम तोट्यात आहे. पाऊस आला तरी नुकसान आणि नाही आला तरी नुकसान असेच चित्र आहे; पण भेंड खुर्द (ता. गेवराई) एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाट देत हे चित्र बदलले आहे.

झेंडूने बहरले आयुष्य, फुलशेतीतून दोन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By
राजू खळगे

अर्धामसला (जि.बीड) : सततचा दुष्काळ. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीव्यवसाय कायम तोट्यात आहे. पाऊस आला तरी नुकसान आणि नाही आला तरी नुकसान असेच चित्र आहे; पण भेंड खुर्द (ता. गेवराई) एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाट देत हे चित्र बदलले आहे. त्यांनी झेंडूचे पीक घेतले. यातून अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी दोन लाखांचे उत्पन्न घेतले. त्यामुळे जणू त्यांचे दुष्काळी आयुष्यच बहरले आहे.


भेंड खुर्द येथील अशोक शिंदे यांनी लॉकडाउनच्या काळात मजुरांचा आधार न घेता शेतात राबवून २५ जूनला ३० गुंठे शेतात चार बाय दीडवर सात हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाच्या साह्याने पाण्याची बचत करीत दोन ते तीन महिन्यांत झेंडूची बाग फुलली. योग्यवेळी फवारणी व कमी प्रमाणात खताचा वापर केला. त्यासाठी त्यांना कृषिदूत रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

अशी मिळाली बाजारपेठ
लॉकडाउनमुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे फुलांच्या बाजार थंड आहे; पण तरीही श्री. शिंदे यांनी बाजारपेठेचा शोध घेऊन मुंबई आणि कल्याण येथे झेंडूची फुले पोचविली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला.


मी ३० गुंठ्यांत झेंडूची शेती केली. त्यातून दोन लाखांचे उत्पन्न काढले. बाजारपेठेचा अभ्यास, पाण्याचे नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या उपयोग करून शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळते.
- अशोक शिंदे, भेंड खुर्द, शेतकरी
 

(संपादन - गणेश पिटेकर)