व्यवसायात बाजारपेठच असते सर्वात मोठा गुरू - चकोर गांधी

सुषेन जाधव
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद : बाजारपेठेत काय विकलं जातं, याची माहिती घ्या व्यवसायात बाजारपेठ हीच सर्वात मोठा गुरू आहे. व्यवसायात एका रात्रीत कोणी मोठे होत नाही, झाले तर ते टिकत नाही त्यामुळे कोणताही व्यवसाय करा पण त्यात वेगळेपण असुद्या अशा शब्दात मॅनेजमेंट गुरू चकोर गांधी यांनी "यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क" यिन समर युथ समीट २०१८ दरम्यान तरुणाईशी संवाद साधला. 

व्यवसाय करण्यासाठी पैसा नाही, आपण ग्रामीण भागातून आलोय, तसेच घराण्यात कोणीच व्यवसाय केला नाही म्हणून व्यवसाय उभारणे थांबवू नका. डोअर टू डोअर मार्केटिंग यातूनही व्यवसायात मोठी भरारी घेतलेली दिग्गज मंडळी आहेत. व्यवसायात केवळ रिस्क घेऊ नका तर कॅल्क्युलेट रिस्क घ्या त्यातून आपल्या व्यवसायाचा मार्ग निश्चित होत असतो असेही  गांधी म्हणाले. 
 
Web Title: market is biggest teacher said Chakor Gandhi