दसऱ्याच्या तेजीवर बाजारपेठा स्वार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

मुहूर्तावर झाले एक हजार गृहप्रवेश, चांगल्या पावसाळ्यानंतर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांची वाढती संख्या

औरंगाबाद - यंदा दमदार पावसाने बाजारपेठेत चांगली उलाढाल व्यापाऱ्यांना अपेक्षित होती. त्यानुसार दिवाळी आणि लग्नसराईच्या बाजारपेठेने चांगले संकेत दिले. दसऱ्यानिमित्त शहरात एक हजाराच्या आसपास गृहप्रवेश झाले. त्याचबरोबर कपडा, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

याबाबत बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले, की पावसामुळे शेतकरी, नोकरवर्ग आणि व्यापारीदेखील सुखावले. तब्बल तीन वर्षांनंतर बाजारपेठेमध्ये दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यावसायिक, बॅंका आणि वित्तीय संस्थेतील चांगल्या ताळमेळीमुळे दसऱ्याच्या दिवशी एक हजाराहून अधिक गृहप्रवेश झाले. यामध्ये जास्तीत निम्म्याहून अधिक गृहप्रवेश दहा ते वीस लाख रुपयांदरम्यानच्या फ्लॅटची विक्री झाली. ग्राहकांनी शेंद्रा-बिडकीन, सातारा, देवळाई आणि हर्सूल भागांतील गृहप्रकल्पाला ग्राहकांकडून प्राधान्य दिले. त्या पाठोपाठ वाहन बाजारामध्ये पाच ते दहा लाख रुपयांदरम्यान असलेल्या कारला विशेषत: नोकरवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे. बाजारातील तेजीवर स्वार होऊन एक हजार कार रस्त्यावर धावल्या. फ्री इन्शुरन्स, कॅश डिस्काऊंट, मोफत ॲक्‍सेसरीज आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त सूट देण्यात आल्याने चारचाकी वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला बघायला मिळाला. चारचाकीमध्ये व्हाईट, सिल्व्हर, ग्रे, रेड आणि ब्लू कारला अधिक मागणी आहे. दुचाकी आणि चारचाकी मिळून तीन हजार वाहने विक्री झाल्याचा अंदाज आहे.

दसऱ्यानिमित्त रिअल इस्टेट, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक, सोने-चांदी आणि कापड बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली उलाढाल झाली. आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या मोसमाच्या बाजाराला सकारात्मक संकेत ग्राहकांनी दिले. त्यामुळे पुढील काळात बाजारपेठेत अजून तेजी बघायला मिळणार आहे.
- अजय शहा, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: market ready for dasara festival

टॅग्स