सामाजिकता कमी, व्यावसायिकता जास्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद - सद्यःस्थितीत हजारो वधू-वर सूचक मंडळे कार्यरत आहेत. त्यातील काहींचे काम खरोखरच चांगले आहे; पण बहुतांश मंडळांमध्ये सामाजिकता कमी आणि व्यावसायिकताच जास्त आहे; मात्र त्यांच्यासाठी शासनाची काहीच नियमावली नाही. परिणामी, विवाहेच्छुकांची लूट होत आहे.
वधू-वर सूचक केंद्रे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारतात. काही मंडळांनी सुचवलेल्या ठिकाणी लग्न जमली; तर पुन्हा ठराविक रक्‍कम द्यावी लागते.

ऑनलाइन नोंदणीमध्ये तर हेच शुक्‍ल दुप्पट-तिप्पट आहे. त्यांच्या नियमावलीनुसार शुल्काच्या प्रमाणात स्थळे दाखविली जातात. एकदा शुल्क भरल्यानंतर त्याचाही कालावधी ठरवून दिला जातो. त्या कालावधीत लग्न जुळले नाही तर पुन्हा नव्याने पैसे भरावे लागतात. सर्वच मंडळे 
व्यावसायिक नाहीत. ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा कुटुंबातील विवाहेच्छुकांचे स्वखर्चाने काही मंडळांनी लग्ने लावून दिल्याचेही उदाहरणे आहेत.

शासनाकडे माहितीच नाही
सार्वजनिक संस्था न्यास कार्यालयाकडे विविध सेवाभावी संस्थांच्या नोंदणी करून त्या सेवाभावी संस्थांतर्गत वधू-वर सूचक मंडळे सुरू करण्यात येतात. यामुळे वधू-वर सूचक मंडळांची नेमकी संख्या या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. 

असे चालते काम
 प्रीमिअर सदस्यांसाठी नऊ हजार
 सामान्य सदस्यांसाठी सहा हजार
 किरकोळ सदस्यत्वासाठी साडेचार हजार रुपये.
 सदस्यत्व घेतल्यास वधू किंवा वराशी संबंधित व्यक्तीला ६० एसएमएस पाठवता येतात.
 ३० स्थळांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देतात.

तालुकास्तरापर्यंत हवेत शासकीय केंद्र
वधू-वर सूचक केंद्राचा अनुभव घेतलेले भारतीय विमान प्राधिकरणातील अधिकारी जी. चंद्रशेखर यांनी पीएमओ कार्यालयाला यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले, या स्वयंघोषित वधू-वर परिचय केंद्रांकडून पालकांची लूट सुरू आहे. सरकारने त्यांच्यावर बंदी घालून तालुकास्तरावर शासकीय विवाह जुळवणी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: marriage bureau Socialism, lack of professionalism