मुलगी पाहायला आले अन् झाले शुभमंगल

देवगाव रंगारी (ता. कन्नड) - संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन करताना नवदांपत्य.
देवगाव रंगारी (ता. कन्नड) - संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन करताना नवदांपत्य.

देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे तिळवण तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमात समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न पार पाडून एक आदर्श निर्माण केला.

येथील राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मधुसूदन महाराज मोगल यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर महराजांनी प्रकाश टाकला.

दरम्यान, याच दिवशी येथील सुभाष वैजनाथ करडे यांची मुलगी सुरेखा हिला बघण्यासाठी चिकलठाणा (ता. कन्नड) येथील गोरख ओंकारशेठ क्षीरसागर यांचा मुलगा दिनेश व पाहुणेमंडळी आलेली होती. मुला-मुलीसह दोन्हीकडच्या कुटुंबीयांची पसंती असल्याने लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राम मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुभाष करडे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने या कार्यक्रमातच लग्न लावावे, असा प्रस्ताव समाज बांधवांनी ठेवला. त्याला दोन्ही परिवाराने मंजुरी दिली. कोणतेही आढेवेढे न घेता, खर्चाला फाटा देत रात्री पुण्यतिथीच्या कार्यक्रमातच हा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.

यावेळी मधुसूदन महाराज मोगल, गोरखनाथ क्षीरसागर, सुभाष करडे, सूर्यकांत करडे, शिवाजी करडे, आसाराम करडे, बाळू साळुंके, गणेश खैरे, सतीश करडे, नवनाथ करडे, शिवनाथ करडे, अविनाश करडे, शुभम करडे, चेतन करडे, किशोर सोनवणे, शेखर खैरे, रेवनाथ करडे, गोकुळ साळुंके, बद्रीनाथ खंडागळे, सचिन करडे, योगेश करडे, रमेश हिरे, सुभाष कर्डिले आदी समाज बांधवांसह पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, सरपंच कविता सोनवणे, सेवा संस्थेचे काकासाहेब सोनवणे, प्रदीप दिवेकर, सागर महाले, ललित सुराशे, महेश चपके, आसिफ पठाण, उमाकांत कुलकर्णी, विशाल श्रीवास्तव, सुनील दाभाडे  उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com