...अन्‌ विवाह थाटात पार पडला

तेरखेडा (ता. वाशी) - विवाह सोहळ्यास उपस्थित मान्यवर.
तेरखेडा (ता. वाशी) - विवाह सोहळ्यास उपस्थित मान्यवर.

उस्मानाबाद - आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी महिलेच्या मुलीचा विवाह देवदत्त मोरे फाउंडेशनने थाटात लावून दिला. तेरखेडा (ता. वाशी) येथे रविवारी (ता.१८) हा विवाह सोहळा पार पडला.

भोगजी (ता. कळंब) येथील बाबूराव नामदेव चिलवंत यांच्या मुलीचा विवाह कचरू धावारे यांच्या मुलाशी ठरला होता. दुष्काळामुळे  जेतमेत शेतीतून हाती काहीच न आल्याने मुलीचा विवाह कसा करायचा, याची चिंता कुटुंबीयांना होती. नातेवाईकांकडे मदतीची विनंती केली. मात्र मदत मिळालीच नाही. नैराश्‍येतून मुलीची आई जयश्री यांनी पाच दिवसांपूर्वी शेतात साडीने गळफास घेतला. प्रसंगावधान राखत त्यांच्या मुलांनी त्यांना वाचविले. देवदत्त मोरे फाउंडेशनकडे याबाबतची माहिती समजली. फाउंडेशनचे अध्यक्ष देवदत्त मोरे यांनी चिलवंत कुटुंबीयांच्या लग्नाची संपूर्ण जबाबादारी घेतली. रविवारी चिलवंत कुटुंबीयांचे पालकत्व स्विकारीत मुलीचा विवाह तेरखेडा येथे मोठ्या थाटात लावून दिला.

श्री. मोरे यांच्यासह प्रा. जगदीश गवळी, उपाध्यक्ष गोपाळ उबाळे, सचिव अविराज सुरवसे, ज्ञानेश्‍वर पतंगे, राजेश पवार आदींनी विवाहामध्ये साहित्य, कपडे, भांडी, मंडप, बॅंड आदी मदत दिली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करीत फाउंडेशनचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com