विवाहितेची पेटवून घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

बावीसवर्षीय विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात सासू व नणंदेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी घाटी रुग्णालयात विवहितेच्या नातेवाइकांनी ठिय्या घातला होता.

औरंगाबाद - बावीसवर्षीय विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात सासू व नणंदेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी घाटी रुग्णालयात विवहितेच्या नातेवाइकांनी ठिय्या घातला होता.

सुमय्या इमरोज खान (वय २२, रा. लक्ष्मण चावडी, जुना मोंढा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नांदेड येथील सुमय्या यांचा गेल्यावर्षी शहरातील इमरोज खान याच्याशी विवाह झाला होता. इमरोज व सुमय्यांचा संसार सुरळीत होता; परंतु सासू व सुमय्या यांच्यात बुधवारी (ता.१०) सकाळी वाद झाला होता. पैसे जमा करून माहेरी देतेस असा आरोप सासूकडून सुमय्यावर लावण्यात आला होता. यातून त्रस्त सुमय्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविले. यानंतर तिचा पती इमरोज याने तिच्या अंगावर चादर टाकून आग विझविली. त्यानंतर सुमय्या यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी सुमय्याचा पोलिसांनी घाटी रुग्णालयात जबाब घेतला. त्यावेळी सासू व नणंदेच्या छळाला कंटाळून पेटवून घेतल्याचे व पतीसोबत वाद नव्हताच असेही तिने आपल्या जबाबात सांगितले. याप्रकरणी बुधवारी सुमय्याच्या सासू व नणंदेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

आश्‍वासनानंतर तणाव निवळला
सुमय्याच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयातील शवागारासमोर गोंधळ घालून ठिय्या घातला. सासूविरुद्ध कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. पोलिसांनी मध्यस्थी करून कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Women Suicide Crime