खर्चाला फाटा देत संभाजी महाराजांच्या साक्षीने केला विवाह

प्रकाश बनकर
मंगळवार, 14 मे 2019

  • लग्नाचा अनावश्यक खर्च टाळला
  • संभाजी महाराजांचे दर्शन घेत घातल्या एकमेकांना वरमाला
  • लग्नसोहळ्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांची उपस्थिती

औरंगाबाद : लग्न म्हटले की थाट माट सोहळा मानपान या सर्व गोष्टी येतात. लाख रुपये खर्च लग्न करण्यात येतात मात्र या सर्व खर्च टाळत छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेऊन एकमेकांना वरमाला टाकून विवाह केला.

29 मे ची लग्नाची तारीख ठरली सगळी तयारी सुरू झाली, मात्र बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी खर्च टाळून लग्न करण्याची विनंती केली होती. ही गोष्ट पटल्यामुळे जीवरग टाकळी (ता. भोकरदन) काकासाहेब जिवरग आणि जाधववाडी (औरंगाबाद) येथील निकिता तायडे यांनी खर्च काढून लग्न करण्यास मान्यता दिली. टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात महाराजांचे दर्शन घेत लग्न केले.

लग्नसमारंभात होणारे लाख रुपयाचे खर्च टाळून तो समाजकार्यासाठी वापरावा याच उद्देशाने बुलंद चावा मराठा युवा परिषदेतर्फे असे अनेक प्रकारचे लग्न साध्या पद्धतीने करण्यात येत आहे. याचाच आदर्श घेत घेत आम्ही लग्नास होकार दिल्याचे काकासाहेब जीवरग यांनी सांगितले. या लग्नसोहळ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे व बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील, मनोज गायके पाटील सतीश वेताळ पाटील, बुलंद छावा या परिषदेचे पदाधिकारी व संभाजी महाराज प्रेमी उपस्थित होते.

आमचं लग्न 29 मे ला लग्नाची तारीख पकडली होती.पण बुलंद छावाचे सुरेश वाकडे यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे खर्च टाळून लग्न करण्याची विनंती केली. मलाही वाजा-गाजा नको होता. दुष्काळावर मात करण्यासाठी हा विवाह शिवकालीन पध्दतीने केला.
- काकासाहेब जीवरग, नवरदेव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married to avoid unnecessary expenses at aurangabad