चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नांदेड : चारित्र्यावर पती सतत संशय घेवून सतत त्रास देत असे. हा त्रास सहन न झालेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासुविरूध्द गुन्हा दाखल झाला. ही घटना 3 नोव्हेंबरला दुपारी शाहूनगर, वाघाळा येथे घडली होती. 

कंधार तालुक्यातील शिरसी येतील पंतु सध्या शहराच्या वाघाळा भागातील शाहुनगरमध्ये राहणारी सुनिता केशव नवघरे (वय 21) हिला तिचा पती चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असे. तिचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला मारहाण करणे, अपमानीत करणे आणि घरातून निघून जा असे म्हणून धमकी देणे. सासरी होणारा त्रास तीने आपल्या माहेरी यापूर्वी सांगितलासुध्दा होता. परंतु आज ना उद्या हा त्रास कमी होईल व सुनिता हीला चांगले नांदवतील या भावनेतून ती तसाच त्रास सहन करून सासरी राहत होती. परंतु तिचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता.

या त्रासाला कंटाळूनतीने वाघाळा येतील आपल्या राहत्या घरी तीन नोव्हेंबरच्या दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस पती व सासु कारणीभूत असल्याची तक्रार मयत विवाहितेच्या काकानी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती केशव बळीराम नवघरे आणि सासु लक्ष्मीबाई बळीराम नवघरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गड्डीमे हे करीत आहेत. 

Web Title: a married woman suicide because of doubt