ऐन दिवाळीत गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

पती- पत्नीच्या किरकोळ वादातून ऐन दिवाळीत रागाच्या भरात पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदीग्राम सोसायटीमध्ये शनिवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. ज्योती अनिल कोकरे (वय २३) मयत महिलेचे नाव आहे. 

नांदेड : पती- पत्नीच्या किरकोळ वादातून ऐन दिवाळीत रागाच्या भरात पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदीग्राम सोसायटीमध्ये शनिवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. ज्योती अनिल कोकरे (वय २३) मयत महिलेचे नाव आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील बऊर (ता. कळमनूरी) येथील अनिल कोकरे हे आपल्या पत्नीसह नांदेडच्या बऱ्ह्यामसिंगनगर भागात सुनील जोगदंड यांच्या वाड्यात किरायाने राहतो. दिवाळी सण हा आपल्या गावाकडे जाऊन साजरी करू असे त्याने पत्नी ज्योतीला सांगितले. परंतु पत्नी ज्योतीची इच्छा होती की दिवाळी येथेच साजरी करायची. यावरून पती- पत्नीत वाद झाला. यानंतर पती आपल्या कामाला निघून गेला. रागाच्या भरात घरी कोणी नसल्याची संधी साधून ज्योती कोकरेने आपल्या खालीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पती घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आली. त्याने लगेच गावी व विमानतळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पती अनिल कोकरे यांच्या माहितीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिनगारे करित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman suicide in Nanded